ट्वेंटी-20 वर्ल्ड कपबाबत आयसीसी पुढील आठवड्यात घोषणा करणार…?

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती, परंतु सद्यपरिस्थिती पाहता वर्ल्ड कप होण्याची शक्यता फार कमी दिसत आहे. पुढील आठवड्यात याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात याबाबत बैठक होणार असून औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.

ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठी तीन पर्याय

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2021मध्ये फेब्रुवारी- मार्चमध्ये आयोजित केली जाऊ शकते, परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यासाठी तयार नाही. कारण लगेचच आयपीएल स्पर्धा आहेत आणि सलग 3-4 महिने ट्वेंटी-20 खेळून खेळाडूंची हालत खराब होऊ शकते. अशात भारताचा इंग्लंड दौराही आहे.

2021मध्ये भारतात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे. बीसीसीआय या वर्ल्ड कपचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला दिल्यास आणि 2022च्या वर्ल्ड कप आयोजन बीसीसीआयला दिल्यास. पण, बीसीसीआय त्यासाठी तयार नाही.

ऑस्ट्रेलियात होणारा यंदाचा वर्ल्ड कप दोन वर्षांसाठी पुढे ढकलला जावा आणि 2022मध्ये ऑस्ट्रेलियाला यजमानपद देण्यात यावं.

”खेळाडूंच्या राहण्या खाण्याची योग्य ती सोय केली जाईल. पण, स्पर्धा झालीच तर ती प्रेक्षकांविना खेळवावी लागेल आणि त्याला काही अर्थ राहणार नाही. ऑस्ट्रेलियाला त्यातून मिळणारा महसूल गमवावा लागेल. त्यामुळे पुढे ही स्पर्धा आयोजित करून महसूल मिळवावा असा प्रयत्न आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here