‘कोरोना’शी लढा देण्यासाठी खास रमजान ईद निमित्त कोकण नगर येथील युवकांनी ‘उम्मिद फाऊंडेशन’च्या वतीने केलं रक्तदान

रत्नागिरी : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रत्नागिरी कोकण नगर येथील युवकांनी नव्याने स्थापलेल्या ‘उम्मिद फाऊंडेशन’च्या वतीने खास रमजान ईद निमित्त साधून रक्तदान केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उम्मिद फाऊंडेशन वतीने आज दि.२५ मे २०२० खास रमजान ईद निमित्त साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले. रक्तदानाचे आयोजन डॉ.बुरहान ढालायात यांचे क्लिनिक येथे सेनेटायझर, फवारणी करून रक्तदात्यांमध्ये अंतर ठेवून शिबिर पार पडले. उम्मीद फाऊंडेशन च्या या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये ६६ बाटल्या रक्ताचे संकलन झाले. सकाळी १०:३० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत या शिबिरात कोकण नगर येथील रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना ग्रस्तांना रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचे आभार मांडण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बोल्डे, रत्नागिरी DYSP श्री.गणेश इंगळे, शहर पोलिस निरीक्षक श्री.अनिल लाड यांनी स्वतः शिबिर ठिकाणी भेट देऊन आभार व्यक्त केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:39 PM 25-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here