आरोग्य विभागातील भरतीसाठी ‘या’ उमेदवारांचा प्राधान्याने विचार व्हावा; आ. निकामांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

चिपळूण : फेब्रुवारी २०१९मध्ये ज्या उमेदवारांनी आरोग्य विभागात जाहिरातीस अनुसरून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदासाठी अर्ज सादर करुन परीक्षा शुल्क भरले आहे, परंतु भरती प्रक्रिया प्रलंबित असल्याने सदर उमेदवारांच्या परीक्षा झालेली नाहीत, अशा उमेदवारांची यादी महाराष्ट्र शासनाच्या आयटी विभागाकडून उपलब्ध करून या उमेदवारांचे वाढते वय व बेरोजगारी लक्षात घेता होणाऱ्या प्रस्तावित भरती करता या उमेदवारांचा अग्रक्रमाने विचार व्हावा व त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सध्या देशभरात तसेच राज्यात कोरोना त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासन स्तरावरून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध माध्यमातून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. या परिस्थितीत आरोग्य विभागातील मनुष्यबळ वाढवून या महामारीतून लवकर सुटका व्हावी, यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या नोकर भरतीला लवकरच सुरू करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही आ. निकम यांनी या नमूद केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here