राष्ट्रपती राजवटीवरून भाजपामध्येच जुंपली; राणे आक्रमक

मुंबई : राष्ट्रपती राजवट लागू करा असं म्हणून महाविकास आघाडीला अस्थिर करणाऱ्या भाजपा मध्येच आता जुंपली आहे. ‘नारायण राणेंनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी नाही’, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. त्यावर आता नारायण राणेंनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जावी हे माझं वैयक्तिक मत आहे. ते राज्यपालांपुढं मांडलं. ते मांडताना मी भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलो नव्हतो. ते सीनिअर असतील तर मीही माजी मुख्यमंत्री आहे,’ असा टोला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना हाणला आहे. मुनगंटीवारांनी राज्यातील कोरोना मृतांचे आकडे पाहावेत आणि मग बोलावं,’ असं राणे म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:42 PM 26-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here