नर्सिंग कॉलेजच्या ५ विद्यार्थीनींची कोरोनावर मात

रत्नागिरी : नर्सिंग कॉलेजच्या ५ विद्यार्थीनींना कोरोना मुक्त करण्यात जिल्हा शासकिय रुग्णालयाला यश आले आहे. बुधवारी पाच विद्यार्थीनी कोरोना मुक्त झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नर्सिंग महाविद्यालयातील एकूण सात विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाली होती. सातपैकी पाचजणींची प्रकृती पुर्णतः बरी झाली असून त्या कोरोना मुक्त झाल्या आहेत. बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, बालरोग तज्ञ डॉ.दिलीप मोरे यांच्यासह सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कोरोना मुक्त केल्याबद्दल त्या विद्यार्थीनींनी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:47 PM 27-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here