महाराष्ट्र सरकार नंतर आता केरळ सरकारचा रेल्वेमंत्रालयावर गंभीर आरोप

नवी दिल्ली : श्रमिक ट्रेनवरुन महाराष्ट्र आणि आणि रेल्वे मंत्रालयात ट्विटर वॉर रंगले असतानाच आता रेल्वेमंत्रालयावर केरळ सरकारने गंभीर आरोप केले आहेत. केरळ सरकारने विशेष श्रमिक ट्रेन हाताळण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला असून राज्य सरकारला श्रमिक ट्रेनची कोणतीही पूर्वमाहिती न देता या ट्रेन पाठवल्या जात असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने आखलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे केरळ सरकारने म्हटले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंबधी पत्र लिहिले आहे. तर रेल्वे केरळमध्ये कोरोनाचा फैलाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे अर्थमंत्री थॉमस यांनी केला आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:58 AM 27-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here