डीबीजेतर्फे ५ जून ला रक्तदान शिबिराचे आयोजन

चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या वतीने दि. ५ जून ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर होईल. कोरोनासारखी साथ पसरत असल्याने मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत डीबीजे महाविद्यालयाने हे शिबिर आयोजित केले आहे. नावनोंदणीसाठी अनिल कलकुटगी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण व चेअरमन मंगेश तांबे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here