‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ टीम चिपळूणात दाखल

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर 3 जून रोजी धडकणाऱ्या ‘निसर्ग’ या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये पाठवली आहे. या टीममध्ये 18 जवानांसोबत आणि 2 अधिकारी आहेत वादळानंतर मोठ्या आकाराचे वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री आहे. ही टीम मंगळवारी येथील आज समुद्र किनारपट्टीची पाहणी करणार आहे. दरम्यान तीन तारखेला या कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:56 PM 02-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here