खेडमध्ये टँकरने पाणीपुरवठा बंद

खेड : तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने पाण्याचे जलस्रोत वाढले आहेत. यामुळे टंचाईग्रस्त गाव-वाड्यांचा टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा तुर्तास बंद केला आहे. तालुक्यात २५ मार्चपासून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. सद्यस्थितीत २० गावे ३८ वाड्यांना एक शासकीय व सहा खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता पाऊस पडल्याने टँकरचा पाणीपुरवठा बंद केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here