रत्नागिरी, सिंधुदुर्ग आरोग्याच्या दृष्टीने सक्षम करण्याचा निर्धार आम्ही केलाय : खा. विनायक राऊत

रत्नागिरी : या प्रयोगशाळेच्या निमित्ताने कोकणच्या आरोग्याच्या दृष्टीने पुनश्च हरिओम झाल आहे. संकटाला संधी समजा आणि त्याचे सोने करा हि शिकवण तुम्ही आम्हाला दिलीत. १४ दिवसात हि प्रयोगशाळा कार्यन्वित करण्यात यश मिळाले. लोकाभिमुक प्रशासन पाहून एक लोकप्रतिनिधी म्हणून मला फार आनंद झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आरोग्याच्या दृष्टीने सक्षम करण्याचा निर्धार आम्ही लोकप्रतिनिधीनी केला आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केले. ते कोरोना प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या प्रयोगशाळेचे लोकार्पण आज करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:24 PM 09/Jun/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here