संगमेश्वरात कोरोनाबाधितांचा आकडा ८८ वर

देवरूख : तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८८ वर जाऊन पोहोचली आहे. यातील २३ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. ६३ रुग्ण कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तालुक्यात २ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ९२० रुग्णांचे स्वब नमुने घेण्यात आले होते. ८८ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. ६४ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. ४ जणांच्या तपासणीतून निदानच झालेले नाही. साडवली येथील ठाकरे विद्यालयातील सेंटरमधून ९३२ व्यक्ती क्वारंटाईन होऊन घरी सोडण्यात आले आहेत. साखरपा महात्मा गांधी विद्यालयातून ११४ व बुरंबी दादासाहेब सरफरे विद्यालयातून २९६ व्यक्ती या क्वारंटाईन होऊन घरी गेल्या आहेत. तालुक्यात मुंबई व पुणे शहरातून आजवर ३९ हजार ३५९ चाकरमानी आले आहेत. यातील १६ हजार ३५९ होम क्वारंटाईन करण्यात आले. यातील १४ दिवस पूर्ण झालेले १२ हजार ७३१ व्यक्ती आहेत सध्या तालुक्यात ३ हजार ६२८ व्यक्ती क्वारंटाईन आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:32 AM 09-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here