कोरोना अपडेट : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 370 वर; ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 144

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57 टक्के

रत्नागिरी : आज दिवसभरात 16 रुग्ण बरे होवून गेल्याने जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 211 झाली आहे. बरे झालेल्यांची टक्केवारी 57 टक्के झाली आहे. दरम्यान आज 2 पॉझिटिव्ह अहवाल आले. (रत्नागिरी 1, लांजा 1), त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 370 झाली आहे. दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील बेलारी गावातील 85 वर्षे वृध्दाचा आज जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला त्यामुळे मृतांची संख्या 15 झाली आहे. दरम्यान, आज घरी सोडण्यात आलेल्या 16 जणांमध्ये जिल्हा रुग्णालयामार्फत 5, लांजा येथील 2, सावर्डा येथील 5 आणि कोविड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथील 4 जण आहेत. 

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:33 PM 10-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here