ब्रेकिंग : अभिनेता सुशांत राजपूत ने केली आत्महत्या

0

हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या वांद्र्यातील राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

बीबीसीच्या सहकारी पत्रकार मधुपाल सिंह यांनी सांगितलं की सुशांत सिंह यांच्या मदतनीसाने बांद्रा पोलीस स्टेशनला आत्महत्येबाबत कळवलं.

डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्शी, एम. एस. धोनी, काय पो चे, सोनचिडिया या चित्रपटातील भूमिकांना प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली होती.

सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. पवित्र रिश्ता या सिरियलमुळे सुशांत सिंह घराघरात पोहोचला होता.

अद्याप त्याच्या आत्महत्येचं कारण समजलं नाहीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here