पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाचे दोन अधिकारी बेपत्ता

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय उच्चायुक्त कार्यालयासोबत काम करणारे दोन अधिकारी मागील काही तासांपासून बेपत्ता झाले असल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्यांचा शोध सुरू आहे. भारताने पाकिस्तान सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दोन गुप्तहेरांना भारतीय तपास यंत्रणांनी अटक केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफचे दोन वाहन चालक ड्युटीसाठी बाहेर गेले होते. मात्र, ते दोघेही इच्छित ठिकाणी पोहचले नाहीत. या वाहन चालकांचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तान सरकारला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सकाळी ८.३० वाजल्यापासून या कर्मचाऱ्यांसोबतचा संपर्क तुटला असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here