राजापुरात रक्तदान शिबिराला प्रतिसाद; ५० रक्तदात्यांनी केले रक्तदान

राजापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने युवासेनाप्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून कोरोना पार्श्वभूमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात खा. विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेनेच्या वतीने केले होते. शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, आ. राजन साळवी, जि.प. अध्यक्ष रोहन बने, माजी आमदार गणपत कदम, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्या उपस्थितीत झाले. रक्तदान शिबिरामध्ये सर्व विभागातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सभापती विशाखा लाड, उपसभापती प्रकाश गुरव, युवासेनेचे शुभम साळवी, माजी शिक्षण सभापती दीपक नागले. शरद लिंगायत, शहर प्रमुख संजय पवार, महिला तालुका संघटक योगिता साळवी, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर आदींसह युवासेना, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विभागप्रमुख रत्नगिरी सिव्हिलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनघा ढोले, राजापूर रुग्णालयाच्या श्रद्धा देवस्थळी, राजेश गेल्ये आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:21 PM 15-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here