कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव

वेलिंग्टन : कोरोनाच्या संसर्गातून मुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन जणांना करोनाची बाधा झाली असून दोन्ही करोनाबाधित रुग्ण ब्रिटनमधून परतले असून दोघांचाही परस्परांशी संबंध आहे. मागील २४ दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. रुग्ण आढळल्यानंतर न्यूझीलंड सरकारने नागरिकांना इशारा दिला आहे. न्यूझीलंडमध्ये करोनाबाधित रुग्ण न आढळल्यामुळे मागील आठवड्यात सर्वच निर्बंध मागे घेण्यात आले होते. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here