भारत-चीन सीमेवर चकमक, तीन भारतीय जवान शहीद

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली. चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील लडाखमधील गलवान खोऱ्यात ही चकमक झाली. लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे. 1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिकांचा मारल्याची घटना घडली आहे.भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गलवान खोऱ्यात सैन्य माघारीदरम्यान अचानक संघर्ष उफाळला आणि रात्रीच्या वेळी चकमक झाली. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही सैन्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. यामध्ये चीनने केलेल्या गोळीबारात भारताचे एकूण तीन जवान शहीद झाले. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here