अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या वडिलांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पितृशोक झाला. वर्षा उसगावकर यांचे वडील आणि गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यात मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते. उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वच स्तरांतून दु:ख व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here