होम क्वारंटाईन न झाल्याने गुन्हा दाखल

चिपळूण : मुंबईहून आलेली व्यक्ती शहर परिसरासह जिल्ह्यात फिरत असल्याची तक्रार दिल्यानंतर चिपळूण पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. १४ जून रोजी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती मुंबई येथून कंटेनमेंट झोनमधून चिपळूण येथे आली होती. त्याच्या घरी चौकशी केली असता तो वेळोवेळी पालवण व रत्नागिरी येथे गेल्याचे सांगण्यात आले. होम क्वारंटाईन राहणे गरजेचे असताना तो बाहेर निघून गेल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here