खेडमध्ये २ महिन्याच्या बालकासह ५ जणांची कोरोनावर मात

खेड : तालुक्यातील तळे येथील एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्या ५ जणांसह २ महिन्यांच्या चिमुरड्याने ही कोरोनावर मात केली व हे सर्व घरी परतले आहेत. एकीकडे वाढती रुग्णसंख्या तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याने ही बाब तालुक्याच्या दृष्टीने दिलासा देणारी ठरली आहे. मुंबई येथून परतलेल्या ५ चाकरमान्यांसह २ महिन्याच्या बालकाला देखील कोरोना झाला होता त्यांना तात्काळ लवेल येथील कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी येथील वैद्यकीय अधिकारी तसेच परिचरिका यांनी केलेल्या योग्य उपचारामुळे ५ जणांसह लहानग्या चिमुरड्याने मात केली असल्याने तालुक्यासाठी ही बाब दिलासा देणारी ठरली आहे. बुधवारी त्या सर्वांना घरी सोडण्यात आले. त्यावेळी उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देत आनंदाने निरोप दिला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:49 AM 18-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here