संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर भारताची अस्थायी सदस्यपदी निवड

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्यपदी दोन वर्षांसाठी भारताची निवड करण्यात आली आहे. भारताला जनरल एसेंबलीमध्ये 192 पैकी 184 मते मिळाली. भारतासह आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांना देखील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवडण्यात आले आहे. 2021-22 या कार्यकाळासाठी भारत आशिया-पॅसिफिक वर्गातून उमेदवार होता. मात्र या वर्गातून एकच उमेदवार असल्याने भारताची सदस्यपदी सहज निवड झाली. या आधी भारताची तात्पुरता सदस्य म्हणून 1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि 2011-2012 अशी सात वेळा निवड झाली होती. त्यामुळे आता भारताची आठव्यांदा या पदी निवड झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:59 AM 18-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here