यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून साधेपणाने साजरा करावा : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : ‘करोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा नेहमीसारखा धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून हा उत्सव साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:35 PM 18-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here