नवी दिल्ली : लडाख सीमेवरुन भारत-चीन या दोन देशात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सोनिया गांधी, जेपी नड्डा, ममता बॅनर्जी आदी दिग्गज नेत्यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:12 PM 19-Jun-20