रेशनदुकानदाराचा ग्रामस्थांनी केला भांडाफोड

गुहागर : पाचेरीसडा येथील रेशनदुकानदाराचा येथील ग्रामस्थांनी भांडाफोड केला आहे. पाचेरीसडा येथील रेशन दुकानात रेशन कार्डावर कमी धान्य दिले जाते व ऑनलाईनवर जास्त खतवले जाते असा अर्ज आल्याने तहसीलदार कार्यालयाने तपासणी केली असता हि बाब उघडकीस आली. सदर दुकानात प्रत्यक्षात ८,७०७ किलो धान्य विकले असून ऑनलाईन ११,१७० किलो धान्य विकले गेले आहे. या जादाच्या २४६३ किलो धान्याची किंमत ७४,११५ इतकी आहे. या प्रकरणी संशयित आरोपी विश्वास विनायक खरे व श्रीकृष्ण दत्तात्रय सावरकर दोन्ही रा. मौजे पाचेरीसडा, ता. गुहागर यांच्यावर गुहागर पोलीस स्थानकात भा. दं. वि. क. ४०६, ४०९ जीवनावश्यक कायदा १९५५ चे कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:29 PM 20-06-2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here