रशियाच्या विजय दिनाच्या परेडमध्ये भारतीय सैन्याचा सहभाग

मॉस्को : भारतीय सैन्याने मॉस्को येथे रशियाच्या विजय दिनाच्या परेडमध्ये सहभाग घेतला. यावेळी भारताच्या तिन्ही सैन्याची तुकडी सहभागी झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. लडाखमध्ये चीनबरोबर सीमा विवाद सुरू असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या तीन दिवसांच्या रशिया दौर्‍यावर आहेत. यावेळी राजनाथ सिंह रशियाच्या विजय दिन परेडच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. रशियाच्या विजय दिन परेडमध्ये भारताच्या 75 सैनिकांच्या तुकडीनेही भाग घेतला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:19 PM 24-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here