आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त लांजात डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप

लांजा : भाजपचे युवानेते, आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा तालुका भाजपाच्यावतीने मंगळवारी ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर, लांजा न. पं. चे नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, शीतल सावंत, पदाधिकारी हेमंत शेट्ये, शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, वासुदेव राणे, शेखर सावंत, बावा राणे अशोक गुरव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here