काँग्रेसतर्फे खेडमध्ये डॉक्टरांना फेसशिल्डचे वाटप

खेड : तालुक्यामध्ये कोरोना साथीत कोरोना बाधित रुग्णांची ख-या अर्थाने सेवा करून तालुक्यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणाऱ्या खेड तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांना नुकतेच खेड काँग्रेसच्या माध्यमातून फेसशिल्ड व मास्क देण्यात आले. काँग्रेसच्या आमदार अॅड. हस्नबानू खलिफे यांच्या सहकार्याने व खेड तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गौस खतीब यांच्या माध्यमातून पंचायत समिती आरोग्य विभागात फेसशिल्ड व मास्क देण्यात आले. यावेळी डॉ. मारकड (फुरूस), डॉ. पाटील (तळे), डॉ. गिरी (कोरेगाव), डॉ. भिसे, वावे, डॉ. चव्हाण (आंबवली), डॉ. कदम (लोटे), डॉ. नदाफ (शिव), अधिकारी तटकरे यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:24 PM 26-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here