इंधन दरवाढीविरोधात सिंधुदुर्गात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

सिंधुदुर्ग : इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो!, चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव!, अक्कड बक्कड बंबे बो 80, 90 पुरे 100, इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे! अशा घोषणा देत कुडाळ येथील प्रांत कार्यालयासमोर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडले. आमदार नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेले इंधन दरवाढीबाबतचे पत्र यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना देण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही इंधन दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज कुडाळच्या एस एन देसाई चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत बैलगाडीने प्रवास करत निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:12 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here