रत्नागिरी तालुक्यातील सात क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर

रत्नागिरी : कोरोनाचे रुग्ण आढळल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या-त्या परिसरामधील भाग कोरोना विषाणू बाधित क्षेत्र (Containment Zone) जाहीर करण्यात आले आहेत. आज साळवी स्टॉप, उद्मनगर, मारुतीमंदीर, चर्मालय, भाटये, टिवंडेवाडी शिरगाव, बौध्दवाडी मिरजोळे, हे तालुक्यातील सात क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार संबधित क्षेत्रातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरुन येणाऱ्या लोकांना सदर बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:33 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here