रत्नागिरी बाजारपेठेत उसळली गर्दी

रत्नागिरी : जिल्ह्यात 1 ते 8 जुलै या आठ दिवसात कडक लॉकडाउन करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासन आणि मंत्री उदय सामंत यांनी काल जाहीर केले. त्यामुळे आठ दिवसाचे धान्य, जिन्नस, तेल, खाद्यपदार्थ आदीच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाहेर पडून बाजारपेठेत सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी केली. नागरिकांनी आठ दिवस नव्हे; तर पुढील पंधरा दिवस ते महिनाभराचा जिन्नस भरून ठेवला आहे. भविष्यात आणखी लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यतेने नागरिकांनी बाजारपेठेत खरेदी करण्याकरता ही गर्दी केली आहे. तळीरामांनी तर पुन्हा गैरसाय नको, म्हणून आठ दिवसाचा मद्याचा स्टॉक भरून ठेवण्यासाठी वाईन मार्टवर रांगाच्या रांगा लावल्या होत्या. मात्र या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सींगचे तीन तेरा वाजल्याचे दिसत होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:24 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here