१ जुलैपासून चिपळुणातील किराणा दुकानेही बंद

चिपळूण : जिल्ह्यात येत्या १ जुलैपासून पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे चिपळूणमधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय तेथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. चिपळूण शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण बरेच वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर त्याचा वाढता प्रसार बघता १ ते ८ जुलै दरम्यान जिल्हा प्रशासनाने जिल्हा लॉकडाउन करावयाचे ठरवले आहे. त्यात सर्व चिपळूणच्या किराणा व्यापाऱ्यांनी आपणहून उत्स्फूर्तपणे आपली दुकाने या काळात बंद ठेवणे अत्यावश्यक आहे. किराणा मालाच्या नावाखाली नागरिक अनावश्यक बाहेर पडत असतात. करोनाची साखळी खरोखरच तोडायची असेल, तर त्यात व्यापाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पडणे गरजेचे आहे. त्यासाठीच चिपळूण किराणा व्यापारी असोसिएशनने १ ते ८ जुलै या लॉकडाउनमध्ये आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष वासुदेव भांबुरे आणि सेक्रेटरी शैलेश वरवाटकर यांनी हे जाहीर केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:07 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here