जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ९८.७३ मि.मी. पावसाची नोंद

रत्नागिरी : मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आता जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा जोर धरला आहे. सोमवारी दिवसभरात ९८.७३ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. गेला आठवडाभर अनेक दिवस उसंत घेत पावसाने दडी मारली होती. सोमवारी दिवसभरात पावसाने १०.९७ मि. मी.च्या सरासरीने ९८.७३ मि.मी पाऊस झाला. मान्सूनच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात पावसाने जोर धरला होता. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, किनारी भागात आणि दुर्गम भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दोन दिवस सायंकाळी पाऊस पडत असल्याने भातलावणीला हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:26 AM 30-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here