रत्नागिरीत बालरंगभूमी परिषदेच्या ऑनलाइन बाल-नाट्यकला स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसाद

रत्नागिरी : बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या ऑनलाइन बाल-नाट्यकला (एकपात्री सादरीकरण) स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मोठ्या गटात बेळगावच्या सोहम संदीप शहापूरकरचा, तर लहान गटात ठाण्याच्या अस्मि अजित पाटीलचा प्रथम क्रमांक आला आहे. लॉकडाउनच्या काळात घरात असलेल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला राज्यभरातून आणि अन्य राज्यांतूनही चांगला प्रतिसाद मिळाला. ११८ स्पर्धकांनी यात भाग घेतला, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेतर्फे देण्यात आली. रत्नागिरी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आसावरी शेट्ये, उपाध्यक्ष राजकिरण दळी, सल्लागार आणि ज्येष्ठ रंगकर्मी अनिल दांडेकर, कार्यवाह किरण जोशी, कार्यकारिणी सदस्य अस्मिता सरदेसाई आणि खजिनदार पूर्वा खालगावकर यांनी एकपात्री प्रयोगांचे परीक्षण केले.

स्पर्धेचा गुणानुक्रमे सविस्तर निकाल असा – मोठा गट – सोहम संदीप शहापूरकर, बेळगाव, वेदिका विनायक मिसाळ, पुणे, सोहम समीर शिराळकर, कोल्हापूर. उत्तेजनार्थ – ईश्वरी सिद्धेश कांदोळकर, फोंडा, आर्यन सुनील जळगावकर, वरळी-मुंबई.
लहान गट – अस्मि अजित पाटील, ठाणे, गार्गी हृषीकेश पटवर्धन, रत्नागिरी, (तृतीय विभागून) – नभा भाग्येश कुलकर्णी, पुणे, इरा उदय गोखले, रत्नागिरी. उत्तेजनार्थ – भक्ती मुकुल चौधरी, नागपूर, काव्यांजली विवेक पाटील, रायगड.विजेत्यांना सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कास्यपदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याबद्दलची माहिती बालरंगभूमी परिषदेतर्फे स्पर्धकांना देण्यात येईल, असे परिषदेच्या आसावरी शेट्ये यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:32 PM 30-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here