इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ

2019-20 या आर्थिक वर्षाचा इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी इनकम टॅक्स भरण्याची मदत पुन्हा वाढण्याचा निर्णय घेतला आहे. इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढवली आहे. इनकम टॅक्स भरण्याची मुदत पाच महिन्याने वाढवल्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी इनकम टॅक्स विभागाने आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवल्याची माहिती दिलीये. आयकर विभागाने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच 2019-20 या आर्थिक वर्षाटा इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर इतकी वाढवण्यात आली आहे. आशा आहे की यामुळे करदात्यांना आर्थिक नियोजन करण्यास मदत होईल.’ दरम्यान, आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयटीआर भरण्याची तारीख यापूर्वीच 31 जुलै 2020 केलीये. त्याचबरोबर केंद्राने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही एक वर्षासाठी म्हणजेच 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:32 PM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here