चिंताजनक ! देशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक

नवी दिल्ली : देशात शनिवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येचा नवा उच्चांक नोंदवला गेला. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल २२,७७१ रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,४८,३१५ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी २,३५,४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३,९४,२२७ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर देशातील एकूण मृतांचा आकडा १८६५५ इतका आहे. तर सध्याच्या घडीला देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.८० इतके आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here