बाप्पाच्या 1500 मुर्त्या फॉरेनला रवाना

रायगड : समस्त भारतीयांचे व परदेशात राहणाऱ्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाप्पाच्या उत्सवावरती सध्या कोरोनाचे सावट पसरलं आहे. त्यातच जिल्ह्याला चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही गणेश मूर्तिकारकारांनी हार न मानता नव्या जोमाने कामाला लागून पेण शहरातील दिपक कला केंद्रांमधून 1500 गणेशमूर्ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया व मॉरिशस येथे पाठविले आहेत. इंडोनेशिया व मॉरिशसला बाप्पाच्या मुर्त्या विमानाने गेल्या आहेत तर दुबई थायलंडला मात्र समुद्रमार्गाने पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती कला केंद्राचे मालक निलेश दीपक समेळ यांनी दिली. दरवर्षी पेण तालुक्यातून लंडन, ऑस्ट्रेलिया, थिवी, अमेरिका, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशससह अनेक देशांना बाप्पाची वारी होते. पेण तालुक्यातून दरवर्षी सुमारे 1 लाख गणेश मुर्त्या फॉरेनला जातात. लंडन ऑस्ट्रेलियन थिवी व अमेरिका येथे बाप्पाच्या मुर्त्या कंटेनर मधून समुद्रमार्ग जहाजाने पाठवण्यात येतात व या प्रवासाला 45 ते 50 दिवस लागतात परंतु यावर्षी लॉकडाउनमुळे या देशांना बाप्पाची वारी होऊ शकली नाही. यावर्षी सुमारे 25 हजार गणेशमूर्तींची वारी फॉरेनला होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here