‘आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे विद्यार्थ्यांना गेले 3 महिने मनस्ताप’

मुंबई ; आधी घोषणा मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. यासोबत सरकारच्या अंतिम वर्षाची परिक्षा न घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. ट्विटरवरून ट्विट करत शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले की, देशातील विद्यार्थ्यांना नोकरी, उच्च शिक्षणात समान संधी मिळावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘एकसूत्री’निर्णय घेतला. शैक्षणिक आरोग्या सोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करुन सप्टेंबर पर्यंत कालावधी वाढवून दिला. आता नोकरीच्या संधीत महाराष्ट्राचे विद्यार्थी मागे पडू नये. मा. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे गाईडलाईनची मागणी पत्राने केली होती. आता राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असं मत शेलारांनी व्यक्त केलं. राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने बचावले, अशा शब्दात शेलार यांनी राज्य सरकारच्या अंतिम वर्षाची परिक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:12 PM 07-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here