पंतप्रधान मोदी ‘इंडिया ग्लोबल वीक’ कार्यक्रमास करणार संबोधित

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटात आयएनसीने ‘इंडिया ग्लोबल वीक’ कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘बी द रिव्हायवल – इंडिया अँड ए बेटर न्यू वर्ल्ड’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात जवळपास 30 राष्ट्रांमधील जागतिक स्तरावरील आणि विविध क्षेत्रात कार्यरत 5000 नागरिक सहभागी होणार. तीन दिवस चालणा-या डिजिटल परिषदेत विविध 75 सत्रांमध्ये जागतिक स्तरावरील 250 वक्ते भाषण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘इंडिया ग्लोबल वीक’ कार्यक्रमास गुरुवार 9 जुलै दुपारी 1:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. याशिवाय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्याम जयशंकर, पियुष गोयल, डॉ शशी थरूर, उद्योजिका संगीता रेड्डी, जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल जी. सी. मुर्मु, ईशा फाउंडेशनचे संस्थापक, सद्‌गुरु, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, युनायटेड किंग्डमच्या परराष्ट्र सचिव डॉमनिक राब, गृहसचिव प्रीती पटेल, अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:19 AM 09-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here