पाण्याच्या पंपासह १८ हजारांचे सामान लांबवले

रत्नागिरी : बाणकोट येथील मौजे धागडेवाडी स्टॉपसमोरील जागेतून अज्ञाताने पाण्याची टाकी, लोखंडी पाईप, लोखंडी पिंजरा आणि पाण्याचा पंप असा एकूण १८ हजार ४०० रुपयांचे सामान लांबवले. याबाबत बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना ५ जून रोजी सायंकाळी ५.४५ ते १७ जून या कालावधीत घडली आहे. याबाबत पुणे येथे राहणाऱ्या जागेच्या मालकाशी चर्चा करुन जागेची देखभाल करणाऱ्या रवींद्र बबन पवार (२३, रा. मंडणगड, रत्नागिरी) यांनी दि. ७ जुलै रोजी सायंकाळी मंडणगड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञाताने धागडेवाडी येथील जागेतील बंगल्याच्या बाहेर ठेवलेली १ हजार लिटरची टाकी, लोखंडी १ फूट लांबीचे ४ पाईप, लोखंडी जाळीचा पिंजरा तसेच पंपहाऊसच्या बंद दरवाजाची कडी कोयंडी उचकटून त्यातील १.५ हॉर्स पावरचा पंप लांबवला. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:39 AM 09-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here