पैसा फंडची बारावी निकालाची उज्वल परंपरा यावर्षीही कायम

0

संगमेश्वर : संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलचा बारावीच्या उज्वल निकालाची परंपरा मुलांनी यावर्षीही कायम राखली आहे. प्रशालेचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.६८, वाणिज्य शाखेचा ९७.११ तर कला शाखेचा निकाल ६८.७५ टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष सुधाकर नारकर, उपाध्यक्ष अभय गद्रे, सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक कालिदास मांगलेकर, पर्यवेक्षक सचिनदेव खामकर यांनी अभिनंदन केले आहे.

विज्ञान शाखेत ७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक संपदा मोहन गुंड ७१.८४, द्वितीय रंजन अनंत फटकरे ६८.९२, तृतीय अर्मता विश्वास शिगवण ६८.४६ टक्के

वाणिज्य शाखेतून १०४ विद्यार्थी प्रविष्ट झाले, त्यातील १०१ उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक युक्ता नंदकुमार गुरव ७८.१५, द्वितीय तेजस प्रकाश फटकरे ७५.००, तृतीय स्नेहल वसंत शिंदे ७२.३० टक्के

कला शाखेतून १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यातील ११ उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक अंकुर भीमराव मोहिते ५६.००, द्वितीय सानिध्य शांताराम बांबाडे ५१.३८, तृतीय पवार अंकिता अशोक, शिंदे दिक्षा उमेश ५०.९२ टक्के

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:38 PM 16-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here