अमेरिकेत 24 तासांत आढळले तब्बल 68,428 नवे रुग्ण

0

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 592,690 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा 35 लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 974 लोकांचा मृत्यू झाला. तर तब्बल 68,428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत 974 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाचे 68,428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 35,60,364 झाली असून आतापर्यंत 1,38,201जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात तब्बल 13,949,386 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8,278,974 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:14 PM 17-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here