‘भाजपने कार्यकारिणीतही स्थान न देऊन नारायण राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली’ : खा. विनायक राऊत

0

मुंबई : नारायण राणे यांची स्थिती म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. भाजपने त्यांना राज्य कार्यकारिणीतही स्थान दिलेले नाही. या माध्यमातून भाजपने राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. खा. राऊत म्हणाले की, नारायण राणे यांचे काम केवळ बोलघेवडेपणाचे आहे. कावीळ झालेल्यांना जसं पिवळं दिसतं तसं शिवसेनेबद्दल द्वेष, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मत्सर या भावनेने त्यांना पछाडलेले आहे. भाजपनेही राज्य कार्यकारिणीत स्थान न देऊन नारायण राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशी राऊत यांनी राणेंवर सडकून टीका केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:03 PM 17-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here