जिल्ह्यात 24 तासात 52 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : मागील 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात 52 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 262 झाली आहे. पैकी एकूण ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 472 आहे.

दरम्यान 23 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 749 झाली आहे. नव्याने पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय रत्नागिरी येथील 5 रुग्ण, घरडा खेड 22 (यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या 132 झाली), उपजिल्हा रुग्णालय कामथे 14, दापोली 5 आणि लांजा येथील 6 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णसंख्या 1 हजार 262 असून यापैकी बरे झालेले रुग्ण 749 आहेत तर आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:40 PM 20-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here