यावर्षी असा साजरा होणार स्वातंत्र्य दिन; केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

0

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा १० लाखांच्या वर पोहचला आहे. अशातच कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं कोरोनाचा प्रार्दुभाव वाढणार नाही यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. आगामी १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे, पण यंदाच्या स्वातंत्र्यता दिनावर कोरोनाचं सावट असल्याने केंद्र सरकारने हा दिवस साजरा करणाऱ्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. या मार्गदर्शक सूचीमध्ये कशा रितीने स्वातंत्र्यता दिन कार्यक्रम साजरा करताना सावधनता बाळगावी, सोशल डिस्टेंसिंगचं पालन केले जावे. मास्क घालूनच कार्यक्रम करण्यात यावा, ज्याठिकाणी कार्यक्रम होणार आहे तिथे योग्य पद्धतीने सॅनिटायझेशनचं करण्याची व्यवस्था असावी. गर्दी टाळावी, त्यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने दिलेल्या सूचनेचे पालन करावं असं सांगण्यात आलं आहे.

या आहेत सूचना :
कोणत्याही भव्य प्रकारचा कार्यक्रम टाळावा, मोठ्या प्रमाणात लोकांना सहभागी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत Web Cast च्या माध्यमातून कार्यक्रम करु शकतो.
लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात सशस्त्र दल आणि दिल्ली पोलिसांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. राष्ट्रीय ध्वज फडकवणे, पंतप्रधान मोदींचे भाषण, त्यानंतर लगेच राष्ट्रगीत आणि अखेर तिरंग्याचे फुगे हवेत उडवले जातील.
स्वातंत्र्यता दिनी राष्ट्रपतींकडून संमेलनाचं आयोजन

राज्य सरकारसाठी देण्यात आलेल्या सूचना :
राज्याच्या राजधानीत मुख्यमंत्री सकाळी ९ वाजता ध्वजारोहन करतील, राष्ट्रगीत, पोलीस गार्ड-पैरा मिलिट्री फोर्सेस, होम गार्ड्स, एनसीसीकडून गार्ड ऑफ ऑनर दिलं जाईल. मुख्यमंत्र्यांचे भाषण आणि अखेर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता होईल.
हा सोहळा छोट्या स्वरुपाचा होईल. म्हणजे जास्त गर्दी होणार नाही. सोशल डिस्टेंसिंगचं पालन केले जाईल. मास्क घालणे अनिवार्य आहे.
मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही म्हटलं आहे की, जिल्हास्तरीय, तहसील व ग्रामपंचायत स्तरावर या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. १५ ऑगस्ट रोजी राज्यातील राजधानी, जिल्हा आणि पंचायत स्तरावर राष्ट्रध्वज फडकविण्यात येईल याची खात्री करुन घ्यावी.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनी समारंभात कोरोना योद्धा डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांना बोलावले जाऊ शकते. कारण कोविड -१९ विरोधातील युद्धात त्यांच्या योगदानाचं कौतुक करता येईल. तसेच कोरोना संसर्गापासून बरे झालेल्या काही लोकांनाही आमंत्रित केले जाऊ शकते

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:43 PM 24-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here