वयाचा आणि प्रकृतीचा विचार करता बालरोगतज्ञ डॉ. मोरे जिल्हा रुग्णालयातील सेवा थांबविणार

0
Doctor with stethoscope in a hospital, back view

रत्नागिरी : बालरोगतज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी जिल्हा रुग्णालयातील आपली सेवा थांबविण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला पत्र दिले. सेवानिवृत्त झाल्यानंतर गेली सात वर्षे जनसेवा करण्यासाठी ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात रुजू झाले. कोरोनाच्या काळात कोव्हिड योद्धा म्हणून 42 चिमुकल्यांवर त्यांनी यशस्वी उपचार करून त्या चिमुकल्यांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका केली. जनसेवक म्हणून त्यांनी केलेले काम आदर्शवत ठरले आहे. कोरोना कालावधीमध्ये लहान मुले आणि 60 वर्षावरील व्यक्तीला घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने डॉ. दिलीप मोरे यांनी आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करून हायरिस्क घेण्यापेक्षा काम थांबविण्याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यांना आता 65 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात कोव्हिड रुग्णालयामध्ये सेवा देणे त्यांच्यासाठी धोक्याचे आहे. म्हणून त्यांनी आपले काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. मोरे यांनी जिल्हा रुग्णालयात अनेक वर्षे सेवा दिली. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या उत्तम सेवेबद्धल पुन्हा आयपीजीएस खाली त्यांना सेवेत घेण्याबाबत निर्णय झाला. गेली सात वर्षे त्यानी जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या प्रदीर्घ काळाच्या अनुभवाचाही अनेकवेळा रुग्णालय आणि रुग्णांना चांगला फायदा झाला. कोरोनाकाळतील चार महिन्यांमध्ये कोव्हिड योद्धा म्हणून अगदी आग्रस्थानी राहुन आपले कर्तव्य बजावले. या कालावधीमध्ये जिल्हा रुग्णालयात 140 मुले दाखल झाली. त्यापैकी 42 मुलांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. या मुलांवर त्यांनी योग्य तो उपचार करून त्यांना कोरोना विळख्यातून बाहेर काढले.सर्व बालकाना सुखरूप घरी सोडण्यात आले. त्यापैकी सात दिवसाचे बाळ आणि 6 महिन्याच्या बाळाला कोरोना झाला. एक बाळ अगदीच कमी दिवसाचे होते. त्यामुळे ही केस अगदीच क्रिटिकल होती. परंतु त्यांनी योग्य खबरदारी घेऊन उपचार केल्याने ते बाळ देखील कोरोनामुक्त झाले. त्यांनी सेवा थांबविण्याचे पत्र दिल्याने जिल्हा रुग्णालयाला नक्कीच त्यांची कमतरता भासणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 24-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here