पंधरागाव : श्री स्वयंभू नागेश्वर हे शंकराच्या बारा ज्योतीलिंगांपैकी आठवे ज्योतिलिंग आहे. हे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालक्यातील चोरवणे या गावात आहे. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य वातावरण आणि उंचउंच धबधबे पर्वत रांगामध्ये आहेत. या ठिकाणी श्रावण सोमवारी अनेक भाविक येत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करीत श्रावण महिन्यात येथे होणारे सर्व धार्मिक उत्सव स्वयंभू नागेश्वर देवस्थान कमिटी चोरवणे यांनी रद्द केले आहेत. तरी भाविकांनी देवदर्शनला येण्याचा प्रयत्न करु नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:25 AM 25-Jul-20