सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले सर्व कार्यक्रम तात्काळ पुढे ढकलण्यात आलेले असून फक्त रक्तदानाचे कार्यक्रम सोशल डिस्टन्सचे नियम पाळून घेण्यात येतील अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना जि.प सदस्य तथा जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब यांनी दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:00 AM 25-Jul-20