मासे पकडण्यास गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू

0

चिपळूण : तालुक्यातील ताम्हणमाळा येथे मासे पकडण्यास गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू आहे. यामध्ये भिवाजी सखाराम गायकर (वय ५०) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मृताचा भाऊ शिवाजी गायकर यांनी चिपळूण पोलिसांना ही खबर दिली. दोन दिवसांपासून भिवाजी हे बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह रविवारी सकाळी बेनवाडी येथे नदीत आढळून आला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:28 AM 27-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here