दापोली तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.४१ टक्के

0

दापोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. दापोली तालुक्याचा निकाल ९८.४१ टक्के लागला. बारावी प्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांनीही या वर्षी बाजी मारली असून, यात मुलींचा यावेळी चढता आलेख आहे. दापोलीतील ४९ शाळेतील २२८० विद्यार्थ्यांपैकी २२७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २२३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७१९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, ९१८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५१० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ८९ विद्यार्थी पास ग्रेड झाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:45 PM 30-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here