राम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यासहित १६ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

0

लखनऊ : जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या आयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. या अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे. एका बाजूला या सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असताना राम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याबरोबच १६ सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अयोध्येत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:34 PM 30-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here